जगभरात नववर्ष 2025 चे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत होत आहे. शेअर बाजारातही हा उत्साह दिसून आला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेअराची सुरुवात समिश्र दिसून आली. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली. पण काही वेळातच उत्साह मावळला आणि दोन्ही इन्डेक्स रेड झोनमध्ये गेले. त्यानंतर बाजार पुन्हा सावरला आणि दोन्ही इन्डेक्स वधारले.
नवीन वर्षात मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा सेन्सेक्स सुरवातीला 100 अंशांनी वाढून 78,240 वर गेला. पण काही वेळातच सेन्सेक्समध्ये घसरण झाली. सेन्सेक्स 78,053 वर येऊन पोहोचला. पण मरगळ झटकूनदुपारपर्यंत सेन्सेक्स पुन्हा वाढला. सेन्सेक्स 78,547 वर म्हणजे सध्या 406 अंशांनी वर आहे. निफ्टीतही आधी घसरण दिसून आली. बाजार सुरू होताच निफ्टी 23,673.65 वर गेला. पण काही वेळात निफ्टीही घसरला आणि 23,607.5 वर आला. मात्र त्यानंतर निफ्टीही वाढून 23.750 वर पोहोचला. निफ्टीत 111 अंशांची वाढ झाली.
बाजारात सर्वात तेजी बँका आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसून आली. एशियन पेंट्स, एसजीव्हीएन, गोडिजिट, एडब्लूएल, कॅस्ट्रॉल इंडिया, आयआरडीए, सुझलॉन, स्टार, डीसीएल आणि बीएमडब्ल्यू या शेअरचे भाव वाढलेले दिसून आले.