
सोमवारी या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 855 अंकांनी उसळून 79.408 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 273 अंकांनी वधारून 24,125 अंकांवर स्थिरावला. हिंदुस्थानी शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी वधारला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही उसळल्याने गुंतवणूकदारांची अक्षरशः चांदी झाली.