शेअर बाजारात तुफानी तेजी; सेन्सेक्स 1400 तर निफ्टी 450 अंकांनी वधारला

शेअर बाजारात या आठवड्यात ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा प्रभाव दिसून आला. ट्रम्प यांनी बुधवारी रात्री चीन वगळता इतर देशांवरील टॅरिफ 90 दिवसांसाठी स्थगित केल्याची घोषणा केली होती. बाजार गुरुवारी बंद असल्याने या निर्णयाचा प्रभाव आज दिसून आला असून शेअर बाजारात तुफानी तेजी आली आहे. शेअर बाजाराने या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने गुंतवणूकदारांवरील ताण कमी झाल्याचे दिसून येत आहे.

शेअर बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला तर काही काळातच त्याने 1400 टप्पा गाठला. तर निफ्टीमध्ये सुमारे 360 अंकांनी वाढ झाली आहे.तसेच बँक निफ्टीही 500 अंकांनी वाढला आहे. सेन्सेक्स आता महत्त्वाचा 75000 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टी 454.60 अंकांनी म्हणजे 2.03 % वाढून 22,853.75 वर पोहचला आहे. तसेच बणक निफ्ची 716.30 अंकांच्या वाढीसह 50,956.45 वर व्यवहार करत आहे.

बीएसईच्या टॉप 30 स्टॉकमध्ये 3 स्टॉक वगळता, इतर सर्व स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ दिसून येत आहे. सन फार्माच्या शेअर्समध्ये 4.44 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, टाटा मोटर्सचा शेअर 4.21 टक्क्यांनी आणि टाटा स्टीलचा शेअर 3.50 टक्क्यांनी वाढला आहे. टीसीएस आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण दिसून येत आहे. शेअर बाजारातील तेजीचे मुख्य कारण म्हणजे बुधवारी जागतिक बाजारात झालेली तेजी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफला 90 दिवसांसाठी स्थगिती दिल्याच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

बुधवारच्या वाढीनंतर, गुरुवारी जागतिक बाजारात मोठी घसरण दिसून आली. डाओ जोन्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. तिथे ते 3 ते 4 टक्क्यांची घसरण दिसून आली. तसेच आशियाई बाजारातही घसरण दिसून आली. जपानचा निक्केई 1400 अंकांनी घसरला होता. चिनच्या शेअर बाजारात थोडीशी तेजी होती. मात्र, चीनचे युआन हे चलन 18 वर्षांच्या निचांकी पातळीवर आले आहे.