Stock Market News – शेअर बाजार उघडताच कोसळला; सेन्सेक्स 400 अंशांनी घसरला, निफ्टीही आपटला

शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. शेअर बाजार सुरू होताच आज मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दणक्यात आपटले. काही मिनिटांत सेन्सेक्स 400 अंशांनी घसरला.

शेअर बाजारात आजची सुरुवात घसरणीने झाली. बीएसई सेन्सेक्स 400 अंशांनी कोसळून 77,848.43 वर आला. सेन्सेक्ससोबतच निफ्टीतही घसरण दिसून आली. निफ्टीही 80 अंशांनी घसरून 23,600 खाली गेला. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठा चढ-उतार दिसून आला.

टाटा मोटर्स, एलटी, झोमॅटो, एसबीआय यासह ऑईल इंडिया, कल्याण ज्वेलर्स, एसीसी यांच्या शेअरचे भाव घसरले.