
गेल्या आठवड्यातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी अर्थात शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. निफ्टी निर्देशांक 22,800 च्या वर बंद झाला. अशातच या आठवड्यात शेअर बाजाराचे कामकाज फक्त तीन दिवस चालणार आहे. बीएसई आणि एनएसई वेबसाइटवरील शेअर बाजारातील सुट्ट्यांच्या यादीनुसार, सोमवार आणि शुक्रवारी बीएसई आणि एनएसईमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 18 एप्रिल रोजी गुड फ्रायडे आहे.