गेल्या काही सत्रांपासून तेजीत असलेला शेअर बाजार आज धडामकन कोसळला. आज आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1,017 अकांची घसरण होऊन तो 81,183 अंकांवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही 292.91 अंकांची घसरण होऊन तो 24,852 वर बंद झाला. शेअर बाजारातील या भूपंपामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल पाच लाख कोटी बुडाले.
सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसली. तर निफ्टीच्या घसरणीत रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि एसबीआयचा वाटा आहे. मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांकात 1.4 टक्क्यांनी घसरला तर स्मॉलकॅप निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकेत मंदीची चाहूल लागल्यानंतर तेथील बाजार रात्रभर घसरल्याचे दिसले, त्यानंतर त्याचा प्रभाव हिंदुस्थानातील शेअर बाजारावर दिसला. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या घसरणीचे पडसाद आशियाई शेअर बाजारावर दिसून आले.