Stock Market Crash – Sensex 1190 अंकांनी घसरला; चार कारणांमुळे शेअर बाजार आपटला, 10 कंपन्यांना बसला दणका

सकाळच्या सत्रात तेजीत असणारा बाजार दुपारच्या सत्रात अचानक कोसळल्याने गुंतवणूकदारांना चांगलाच फटका बसला आहे. BSE Sensex 1190 अंकांनी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 360 अंकांनी आणि बँक निफ्टीमध्ये 370 अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मालामाल झालेल्या गुंतवणूकदारांचा खिसा दुपारच्या सत्रात रिकामा झाल्याचे चित्र आहे. अचानक बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांची चांगलीच भंबेरी उडाली.

सकाळच्या सत्रामध्ये शेअर बाजारात चांगली तेजी दिसत होती. मात्र, दुपारच्या सत्रात अचानक शेअर बाजारात पडझड सुरू झाली. बीएसई सेन्सेकच्या टॉप 30 समभागांमध्ये SBI सोडून मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मात्र, सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रातील समभागांना बसला आहे. Infosys 3.50 टक्के, बजाज फायनान्स 2.90 टक्के या स्टॉक्स व्यतिरिक्त TCS, Reliance Industries, HCL Tech, Adani Port आणि Nestle India या समभागांमध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली आहे.

शेअर बाजारात घसरण झाल्याची चार कारणे सांगितली जात आहे. अमेरिकेत फेड रेटमध्ये कपात करण्यात आल्याने याचा सर्वात मोठा फटका आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे. तसेच रशियाने युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याने त्याचा परिणाम थेट शेअर बाजारावर जाणवला. आयटी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये 3 टक्क्यांची घसरण झाल्याने त्याचा परिणार शेअर बाजारावर दिसून आला. तसेच परेदशी गुंतवणूकदारांना अमेरिकी बाजारात चांगली वाढ होण्याची चिन्ह दिसत आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष जागतीक बाजारावर असल्याने त्याचा शेअर बाजारावर परिणाम होत आहे.

शेअर बाजारात या 10 कंपन्यांच्या समभागांना चांगलाच दणका बसला आहे. अंबर एंटरप्रायजेस हा स्टॉक्स सर्वाधिक 7.6 टक्क्यांनी कोसळला असून 5982 रुपयांवर स्थिरावला आहे. याच बरोबर ट्रिब्यून टर्बाइन, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, इन्फोसिस, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, मॅक्स फिन सर्व्हिसेस, मॅक्स हेल्थकेअर, इस्कॉर्ट्स आणि टाटा टेली सर्व्हिसेस या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे.

(शेअर, खऱेदी विक्री व बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)