मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार आणि निफ्टीने ग्रीन झोनमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू केले. सुरुवातीचा काही काळ दोन्ही निर्देशांक वधारले आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 280 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. तर निफ्टी 85 अंकांनी वधारलेला पाहायला मिळाला होता. मात्र अवघ्या दोन तासांतच चित्र पलटले. निर्देशांकातील 30 शेर्सचा निर्देशांक 849.50 (1.07%) च्या मोठ्या घसरणीसह 78,373.61 च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टी देखील तो 266.50 अंक (1.11%) घसरून 23,738.25 च्या स्तरावर पोहोचला.
याआधी सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 79,223.11 स्तरावरून 280.17 अंकांच्या वाढीसह 79,281.65 च्या स्तरावर उघडला त्यानंतर 79,503 च्या स्तरावर पोहोचला.
शेअर बाजारात अचानक झालेल्या या घसरणीदरम्यान, टाटा स्टीलचा शेअर सर्वात जास्त घसरला. अखेरचे अपडेट मिळाले तेव्हा टाटा स्टीलचा शेअर 3.62% घसरून 133.30 रुपयांवर व्यवहार करत होता. याशिवाय कोटक बँक शेअर 2.57%, पॉवरग्रिड शेअर 2.10%, एशियन पेंट्स शेअर 2%, अदानी पोर्ट्स शेअर 2% ने घसरला.
BSE च्या 30 पैकी 24 लार्ज कॅप कंपन्या लाल रंगात व्यवहार करत होत्या. घसरलेल्या इतर मोठ्या नावांमध्ये M&M, NTPC, नेस्ले इंडिया, झोमॅटो, HDFC बँक, रिलायन्स, SBI, ITC, भारती एअरटेल, टाटा मोटर्स आणि TCS यांचा समावेश आहे.