अमेरिकेचा एक निर्णय अन् हिंदुस्थानचा शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 1100 अंशांनी कोसळला

अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर कपात जाहीर केली. फेडरल बँकेने बुधवारी 0.25 बेसिस पॉइंट इतकी कपात व्याजदर कपात केली. ही सलग तिसरी कपात आहे. यामुळे अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला. याचा परिणाम हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही झाला आणि बाजार सुरू होताच आपटला.

अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या निर्णयामुळे गुरुवारी हिंदुस्थानचा शेअर बाजारही हादरला. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 1100 अंशांहून अधिक कोसळला. तर निफ्टी 400 अंशांनी आपटला. मात्र, काही वेळानंतर बाजाराची स्थिती सुधारली. सेन्सेक्स अजूनही 917 अंशांच्या खाली आहे.

सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर पैकी दोन शेअर सोडले तर सर्व शेअरचे भाव कोसळले. सर्वाधिक फटका हा इन्फोसिसला बसला आहे. इन्फोसिसच्या शेअरच्या भावात 3 टक्के घसरण दिसून आली. तर निफ्तीतील 47 शेअरचा व्यवहार दबावात सुरू आहे. इन्फोसिस. टीसीएस, एपसीएल, महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरचे भाव 2 टक्क्यांनी घसरले आहेत. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे 5.93 लाख कोटी रुपये बुडाले.