ट्रम्प यांच्या लांबलचक भाषणाने स्टेनोग्राफर त्रस्त; टाइप करताना अवस्था होतेय बिकट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून ट्रम्प लांबलचक भाषणे ठोकत आहेत. बोलताना ते प्रचंड वेगाने बोलत असून त्यांची विधाने टाइप करताना स्टेनोग्राफरची अवस्था अत्यंत बिकट होत आहे. फॅक्टबे एसई या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार 2021 मध्ये पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या आठवडय़ात बायडेन पॅमेऱ्यासमोर 24,259 शब्द बोलले. त्यासाठी त्यांना 2 तास 36 मिनिटे लागली. 2021 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प हे 7 दिवसांत तब्बल 81,235 शब्द बोलले. इतके शब्द बोलण्यासाठी त्यांना 7 तास 44 मिनिटे लागली. मॅकबेथ, हॅम्लेट आणि रिचर्ड तिसरा या तीन पुस्तकांतही ट्रम्प जितके बोलले तितके शब्द नाहीत. त्यावेळी ट्रम्प पहिल्या आठवडयात 33,571 शब्द बोलले.