जपानमध्ये उभारला, मुंबईच्या अरबी समुद्रात कधी?

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूध पुतळा जपानच्या टोकियोत उभारण्यात आला आहे. या ठिकाणी एक स्मारक आणि 8 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा मोठया दिमाखात दिसत आहे. या पुतळ्याला भूकंप आणि त्सुनामी आल्यानंतरही 100 वर्षे काहीच होणार नाही, असे सांगण्यात आलेय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा साता समुद्रापार जपानमध्ये उभारण्यात आला ही आनंदाची बाब आहे. परंतु, मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधीपर्यंत उभारण्यात येईल, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.