दहा हजाराची लाच घेताना वरिष्ठ सांख्यिकी अधिकाऱ्याला अटक, पत्नीच्या अकाऊंटवर घेतले पैसे

नवी मुंबईतील बेलापूर येथील नॅशनल स्टॅटीस्टिकल सर्वे ऑफिसमधील वरिष्ट सांख्यिकी अधिकाऱ्याला (Senior Statistical Officer) दहा हजार रुपयांची लाज घेतल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. या अधिकाऱ्याने त्याच्या पत्नीच्या खात्यावर हे पैसे घेतले होते.

शंकर राघोर्ते असे त्या अधिकाऱ्याचे नाव असून आहे. नॅशनल स्टॅटीस्टिकल सर्वे विभागाकडून प्लास्टिकचे फाईल्स आणि फोल्डर्स बनवणाऱ्या एका कंपनीला नऊ वेळा नोटीस बजावण्यात आली होती. इंडस्ट्रिज परताव्याचा वार्षिक सांख्यिकी अहवाल सादर करण्यासाठी शंकर राघोर्ते हे आपला छळ करत असून त्यांनी आपल्याकडून दहा हजार रुपये लाज घेतल्याची तक्रार कंपनीच्या मालकाने सीबीआयकडे केली होती. कंपनीच्यास मालकाने सदर पैसे राघोर्ते यांच्या पत्नीच्या अकाऊंटला घेतले होते.

या प्रकरणी 10 फेब्रुवारी रोजी राघोर्तेला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची 13 फेब्रुवारी पर्यंत पोलीस रिमांडमध्ये पाठवले होते.