
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे नोकऱ्या जाण्याचा धोका नव्हे. एआयमुळे नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीला चालना मिळेल, कामाचे स्वरूप बदलेल, असे प्रतिपादन टीसीएसचे एआय विभागाचे जागतिक प्रमुख क्रिश अशोक यांनी केले. क्रिश म्हणाले, एआय हा केवळ एक तांत्रिक बदल नाही, तर एक सांस्कृतिक परिवर्तन आहे. प्रत्येक बदल भीती निर्माण करतो. एआय ही फक्त पुढची उक्रांती आहे, जी अधिक तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरेल. मला वाटते की नोकरी गमावण्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहणे चुकीचे आहे.