
देशाच्या-जगाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि अभ्यासकांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुलुंड पश्चिम नाहूर गावात दोन एकर जागेवर 100 कोटी खर्च करून अत्याधुनिक पक्षीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये देश-विदेशातील दुर्मिळ पक्षी ठेवण्यात येतील. या पक्षीसंग्रहालयासाठी जागेच्या फेरबदलासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे पक्षीसंग्रहालय साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर नाहूरचे पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. भायखळा येथील पक्षी विहाराप्रमाणे हे पक्षीविहारात लवकरच विविध प्रकारचे पक्षी मुंबईकर-पर्यटकांना पाहता येणार आहेत.
z उद्यानाला लागूनच असलेल्या मफतलाल मिलचा सुमारे दहा एकरचा भूखंड पालिकेला मिळाला आहे. या जागेत आधुनिक पद्धतीचे पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास जुन्या पक्षीगृहात अतिरिक्त असलेले पक्षी मफतलाल भूखंडावरील प्रस्तावित पक्षीगृहात पाठवले जाणार आहेत.
असे होणार काम
z नाहूर गावात सुमारे सहा एकर जागा पालिकेकडे उपलब्ध आहे. यातील दोन एकर जागेत हे पक्षीगृह उभारण्यात येईल. भायखळा येथील उद्यान व प्राणिसंग्रहालयाचाच भाग म्हणून हा पक्षीविहार विकसित करण्यात येईल. पर्यटकांसाठी पार्पिंग, खाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि पक्षीविहारासाठी झाडांची लागवडही केली जाणार आहे.
z अत्यंत अद्ययावत पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सार्वजनिक सुविधांसह पक्षीगृहाचा आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.