हिंदुस्थानातील प्रदूषित हवा किती घातक ठरू शकते, हे सांगणारा आंतरराष्ट्रीय अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. अत्यंत धक्कादायक असा हा अहवाल आहे. अहवालानुसार हिंदुस्थानात दररोज पाच वर्षांखालील 464 मुलांचे मृत्यू प्रदूषित हवेमुळे होतात, तर दररोज जगभरातील दोन हजार तरुणांच्या मृत्यूला प्रदूषित हवा जबाबदार आहे.
अमेरिकेच्या हेल्थ रिपोर्ट इन्स्टिटय़ूटने हा अहवाल तयार केलाय. ‘स्टेट ऑफ ग्लोबर एअर 2024’ असे त्याचे नाव आहे. जगभरात प्रदूषित हवा हे मृत्यूचे मोठे कारण ठरत असल्याचे अहवालात म्हटले आहे. उच्च रक्तदाब हे पहिले, तर दूषित हवा हे दुसरे मोठे मृत्यूचे कारण आहे. तंबाखू आणि मधुमेहापेक्षाही दूषित हवा जास्त घातक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
n 2021 साली जगभरात आठ कोटींहून अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाले. याच वर्षी हिंदुस्थानात 2.1 कोटी, तर चीनमध्ये 2.3 कोटी लोकांचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाला.
n हिंदुस्थानात हृदयरोग, फुप्फुसांचे पॅन्सर, मधुमेह, लकवा यांसारखे आजार बळावण्यामागे प्रमुख कारण म्हणजे दूषित हवा. 2021 मध्ये हृदयरोगाने 40 टक्के मृत्यू, तर फुप्फुसाच्या पॅन्सरने 33 टक्के लोक मरण पावले. ‘टाईप 2’ मधुमेहाने 20 टक्के आणि लकव्यामुळे 41 टक्के लोक मृत्युमुखी पडले.