जागृती मंचाच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धा महोत्सव

प्रातिनिधीक फोटो

लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत असे सर्वांना आनंद देणाऱया राज्यस्तरीय स्पर्धा महोत्सवाचे आयोजन डिलाईल रोड येथील जागृती मंचकडून करण्यात आले आहे. 18 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱया या महोत्सवात पाककला, चित्रकला, रस्सीखेच, करा ओके गायन स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे माध्यम प्रायोजक दैनिक ‘सामना’ आहे.

डिलाईल रोडवर जागृती मंच गेल्या 26 वर्षांपासून गिरणगावात शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे. या महोत्सवात दरवर्षी हजारो शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे, विद्यार्थी घडवणारी संस्था असा संस्थेचा लौकिक असून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिह्यांतून हजारो स्पर्धक उस्फूर्तपणे सहभागी होतात. महोत्सवाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष आणि वरळी विधानसभेचे उपविभागप्रमुख राम साळगावकर यांनी केले आहे.

पाककला स्पर्धा ः स्पर्धेचा विषय ः हिवाळ्य़ातील पौष्टिक पदार्थ (फक्त महिलांकरिता), प्रवेश विनामूल्य, शनिवार, 18 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता, स्थळ – श्रमिक जिमखाना, डिलाईल रोड, संपर्क – शीतल जाधव – 810862062
एकपात्री अभिनय स्पर्धा ः रविवार, 19 जानेवारी, सकाळी 10 वाजता खुला गटाकरिता, स्थळ – शांतीनगर शाळा, सातरस्ता, संपर्क – तुषार होडगे – 9870498044
रस्सीखेच स्पर्धा ः रविवार, 19 जानेवारीला दुपारी 4 वाजता, स्थळ – श्रमिक जिमखाना, डिलाईल रोड, व्यावसायिक गट, ग्रामस्थ व क्रीडा मंडळ गट, महिलांचा गट, संपर्क – ओमकार साळगावकर – 8169951381
करा ओके गायन स्पर्धा ः शनिवार, 25 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता, स्थळ – मुंबई पब्लिक स्कूल, शांती नगर, साने गुरुजी मार्ग, कस्तुरबा रुग्णालयासमोर, मुंबई – 11, संपर्क ः अनिल जाधव – 8108362061

शालेय गटांकरिता चित्रकला स्पर्धा
गट 1 ः 1ली ते 2री विषय – 1) आवडता प्राणी
गट 2 ः 3री ते 4थी विषय – 1) माझे गाव 2) आवडता खाद्य पदार्थ
गट 3 ः 5वी ते 6वी विषय – 1) माझी शाळा, 2) नाताळ सण
गट 4 ः 7वी ते 8वी विषय –  1) माझा वाढदिवस, 2) जत्रा
गट 5 ः 9वी ते 10वी 1) एक सायकल शर्यत, 2) ट्रेनची सफर
रविवार, 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता, स्थळ – श्रमिक जिमखाना, ना.म. जोशी मार्ग, म्युनिसिपल शाळा, डिलाईल रोड लोअर परळ, पूर्व.
संपर्क ः चंद्रकांत गावडे – 8097634442