
भारतीय प्रशासन सेवेतील सात अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने आज बदल्या केल्या आहेत. एमएमआरडीएचे सहमहानगर आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची मीरा-भाईंदर पालिका आयुक्त पदावर नियुक्ती झाली.
एम.जे. प्रदीप चंद्रेन यांची बदली पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आली आहे. बाबासाहेब बेलदार यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली.
जगदीश मिनियार यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर करण्यात आली आहे. गोपीचंद कदम यांना अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
डॉ. अर्जुन चिखले यांची बदली सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. तर यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
वैदेही रानडे रत्नागिरी जिल्हा परिषद सीईओ
दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील कैलास जाधव यांना एमएसआरडीसीमधून हटवून ज्यांच्याकडे त्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेल्या वैदेही रानडे यांची बदली रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर करण्यात आली आहे.