एन.डी. स्टुडिओच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकार नेमणार सल्लागार

राज्य सरकारने ताब्यात घेतलेल्या एन.डी. स्टुडिओचे आधुनिकीकरण व व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने तज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

भविष्यातील सिनेमा व मनोरंजन क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन एन.डी. स्टुडिओच्या आधुनिकीकरणाच्या आराखडय़ासाठी सल्लागारांचे मार्गदर्शन घ्यावे. या स्टुडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त संख्येने पर्यटक, व्यावसायिक, निर्मात्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यात प्रामुख्याने मराठी सीरियल्स, सिनेमा, वेब सीरिज, ओटीटी माध्यमात काम करणाऱया निर्माते, कलाकारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना मंत्रालयात आयोजित बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी दिल्या.