राज्य नाटय़ स्पर्धेचे उद्घाटन 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाटय़गृह येथे होणार आहे. नाटय़प्रेमीनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 63 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी 24 नोव्हेंबपासून राज्यातील विविध 24 जिल्हास्तरावरील पेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी रंगभूमी समृध्द करण्याकरिता विविध उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेची गौरवसंपन्न 62 वर्षे अविरत वाटचाल चालू आहे. ज्याद्वारे अनेक नाटककार अभिनेते, तंत्रज्ञ व दिग्दर्शक निर्माण झाले आहेत. त्यांनी नवनवीन प्रयोग करून या उपक्रमास व मराठी रंगभूमीस समृध्द करुन वैश्विक स्तर प्राप्त करून दिला आहे.