
भारतीय स्टेट बँकेने आपल्या लाखो ग्राहकांना सायबर फ्रॉडसंबंधी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेकडून एक टेक्स्ट मेसेज पाठवण्यात आला आहे. एसबीआयच्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार हे रिवॉर्डस् पॉइंट्स रिडीम करण्याचे आमिष दाखवतात. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकांनी अनोळखी लोकांकडून आलेल्या मेसेज किंवा कॉल्सवर लक्ष देऊ नये, असे बँकेने म्हटले आहे.