स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जाचे नवे व्याजदर जाहीर करत नवीन वर्षात कोटय़वधी ग्राहकांना दिलासा दिला. 15 जानेवारीपासून नवे दर लागू झाले आहेत. एमसीएलआर हा असा दर आहे ज्यापेक्षा कमी व्याजदरात बँक ग्राहकाला कर्ज देऊ शकत नाही. एमसीएलआरचा थेट परिणाम ग्राहकांचा कर्जावर होतो. म्हणजे एमसीएलआरमध्ये घट किंवा वाढ झाली तर होम लोन, पर्सनल लोन, कार लोनचा ईएमआय कमी होऊ शकतो किंवा वाढू शकतो. एसबीआयने एक महिन्याचा एमसीएलआर 8.20 टक्क्यांवर कायम ङ्खेवला आहे, तर दुसरीकडे तीन महिने, सहा महिने आणि एका वर्षाचा एमसीएलआर अनुक्रमे 8.55 टक्के, 8.90 टक्के आणि 9.05 टक्क्यांवर कायम आहे. दोन वर्षांचा एमएलसीआर 9.05 टक्क्यांवरून 8.05 टक्के करण्यात आलाय, तर 3 वर्षांचा एमएलसीआर 9.10 टक्क्यांवर कायम आहे.
– एसबीआयचा बेस लेंडिंग रेट एमसीएलआर 8.20 ते 9.10 टक्के आहे. ओव्हरनाईट एमसीएलआर दर 8.20 टक्के आहे.
– एमसीएलआरचा थेट परिणाम तुमच्या होम आणि कार लोनच्या ईएमआयवर होतो.
– एमसीएलआरचे दर वाढल्याने नवीन कर्जे महाग होतात. तसेच तुमच्या होम आणि कार लोनचा ईएमआय वाढतो.
– जर तुमचा एमएलसीआर कमी झाला तर ईएमआय कमी होतो.