दिल्लीत स्टार्टअप महाकुंभाला सुरुवात

दिल्लीतील भारत मंडपम येथे आजपासून स्टार्टअप महाकुंभाला सुरुवात झाली आहे. 3 एप्रिल ते 5 एप्रिल असे तीन दिवस हा स्टार्टअप महाकुंभ चालणार आहे. यामध्ये तीन हजारांहून अधिक स्टार्टअप्स, एक हजारहून अधिक गुंतवणूकदार आणि 50 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात 10 क्षेत्रांचे मंडप तयार करण्यात आले आहेत. यात एआय, डीपटेक, सायबर सुरक्षा, आरोग्य तंत्रज्ञान, बायोटेक, कृषी तंत्रज्ञान अंतराळ यांचा समावेश आहे.