नायरमध्ये हृदय विकारावरील शस्त्रक्रिया तातडीने सुरू करा! सुनील शिंदे यांची मागणी

नायर रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया आठवडाभरापासून बंद आहेत. कारण शस्त्रक्रियेसाठी लागणारे सामान पुरवणाऱया पुरवठादाराची बिले मंजूर झालेली नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया बंद आहेत. नायर हे मुंबई महानगरपालिकेचे महत्त्वाचे रुग्णालय आहे. बरेच मुंबईकर नायर रुग्णालयात उपचार घेत असतात. मुंबईतील प्रचंड ताणतणावामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत माहितीच्या मुद्दय़ाद्वारे केली. मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या दोन दिवसांत त्यावर उपाययोजना होईल, असे आश्वासन दिले.

अपारबद्दलचा पालकांचा संभ्रम दूर करा

सर्व विद्यार्थ्यांना एक ऑटोमोटीव्ह परमनंट (अपार) आयडी तयार करण्याची सूचना दिली गेली आहे. या आयडीमुळे मुलांचा वैयक्तिक डाटा लिक होणार नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे. एका बाजूला ही सक्ती करत असतानाच पालकांच्या संघटना विचारताहेत की हा आयडी दिल्यानंतर मुलांना लस दिली जाणार आहे असे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम असून तो दूर झाला पाहिजे, असे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत मुद्दय़ाद्वारे सांगितले. त्यावर शासनाने अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले.