जगन्नाथ पुरीच्या रथ यात्रेत चेंगराचेंगरी, एका भाविकाचा मृत्यू

रविवार 7 जुलै पासून ओडिशामध्ये सुरू झालेल्या भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेत चेंगराचेंगरी झाली असून एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत शेकडो भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जगन्नाथ पूरीच्या रथ यात्रेला देश विदेशातून लोक येत असतात. गेल्या 53 वर्षां पासून ही यात्रा फक्त एकच दिवस असायची मात्र यंदा ही यात्रा 53 वर्षानी दोन दिवस होणार आहे. त्यामुळे लाखो भाविक ओडिशा मध्ये दाखल झाले आहेत. रविवारी ही यात्रा सुरू झाल्यानंतर गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणा बाहेर गेली. बलभद्र यांचा रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्याचदरम्यान, तिथे गोंधळ उडाला, धक्काबुक्की सुरू झाली आणि या गोंधळाचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं