एसटीमध्ये सुटय़ा पैशांवरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वादावादी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ते टाळण्यासाठी एसटीने आता यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही वादाशिवाय त्यामुळे प्रवास होऊ लागला असून रोख रकमेपेक्षा यूपीआयद्वारे मिळणारे एसटीचे उत्पन्न वाढले आहे. एसटी महामंडळाने कंडक्टरकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन दिले आहेत. त्या मशीनच्या माध्यमातून यूपीआयद्वारे तिकिटाचे पैसे दिले जाऊ शकतात.