शिवशाही सुरूच राहणार, बंद पडण्याच्या अफवांवर एसटी महामंडळाकडून स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बसच्या अंतर्गत आणि बाह्य रचनेत आवश्यक ते बदल करून तिचे रूपांतर साध्या लालपरी बसमध्ये करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर यावर एसटी महामंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

एसटी महामंडळाकडे सध्या 792 वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण सोमवारी एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. तत्कालीन परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या ठरावामुळे शिवशाही बस सुरू झाली. 10 जून 2017 रोजी मुंबई-राजगिरी मार्गावर पहिली शिवशाही बस धावली. त्यानंतर राज्यभरात शिवशाही बसेस धावू लागल्या. निम्या दरात वातानुकूलित बसची सुविधा मिळत असल्याने महिला प्रवाशांची चांगली पसंती शिवशाही बसला मिळत आहे.