
>> प्रसाद नायगावकर
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला अनेक वारकरी तसेच विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशी निमित्त वर्धा एस टी डेपोने खास वारकऱ्यासांठी पंढरपूर करिता विशेष बस सोडली . मात्र वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटी बस च्या मद्यधूंद बस ड्रायव्हरने मद्याच्या नशेत तर्राट होऊन पुसद जवळ सुधाकर नाईक पुतळ्याजवळ एका डिव्हायडरला जबर धडक दिली . या अपघात झाल्याने बस मधील 45 वारकऱ्यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र यात एक वयोवृद्ध आजी व एका युवकास गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे .
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे एस टी महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे . प्रवाश्यांच्या सेवेसाठी वर्धा एस टी डेपोने पंढरपूर करिता जादा बस ही सोडली. पण या बसच्या चालकाने आणि एस टी कंडक्टर ने प्रवासाच्या दरम्याने मद्य प्राशन केले मग या तर्राट झालेल्या बस ड्रायव्हरने नशेच्या अमलात भरधाव गाडी हाकली. प्रवाशांनी गाडी व्यवस्थित चालवावी अशी कंडक्टरकडे विनंती केली असता उलटपक्षी या कंडक्टरने प्रवाशांशी हुज्जत घालीत गाडीबाहेर उतरण्याचा सल्ला दिला. शेवटी पुसद जवळ या बस ड्राइवर ने पुसद जवळ सुधाकर नाईक पुतळ्याजवळ एका डिव्हायडरला जबर धडक दिली. अपघात होताच मदतीसाठी नागरिक जमा झाले. काही युवकांना बस ड्राइवर आणि कंडक्टर हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आले. या युवकांनी ड्राइवरच्या बॅगेची तपासणी केली असता यात दारूच्या मोठ्या बाटल्या आढळल्या. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पण पोलीस येण्या आधी काही संतप्त युवकांनी या बस ड्राइवर आणि कंडक्टर ला थोडासा महाप्रसाद दिल्याचे समजते.
आरोपी एस टी ड्राइवर सचिन गव्हाणेला आणि कंडक्टर प्रदीप सूर्यवंशी याला आम्ही लगेच ताब्यात घेतले . जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम आहे . उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या एस टी बस ने पंढरपूरला रवाना केले आहे. आरोपींविरुद्ध कला 279 , 337 आणि मुंबई दारूबंदी कायदा 85 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. दारू पिऊन अश्याप्रकारे गाडी चालविणे ही अतिशय चिंतेची बाब आहे.
उमेश बेसरकर (पोलीस निरीक्षक , पुसद शहर )