जालन्यातील नाव्हा चौफुलीवर  एसटी बस – ब्रेझा कारचा अपघात ; 16 प्रवाशी जखमी

हिंगोलीहुन पुण्याकडे जाणारी बस आणि जालना शहरातून सिंदखेड राजा कडवंची कडे जाणाऱ्या ब्रेझाचा सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जालना शहराजवळील नाव्हा चौफुली येथे अपघात झाला. या अपघातामध्ये बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली तर ब्रेझाच्या समोरच्या भाग चेंदामेंदा झाला आहे सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही परंतु बसमधील 16 प्रवासी आणि कार मधील तिघेजण जखमी झाले आहेत. ब्रेझा चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे अपघात झाल्यानंतर एअर बॅग उघडली आणि या तिघांचे प्राण वाचले.

ही बस हिंगोली ते पुणे जात असतांना सिंदखेड राजा चौफुली जालना येथे ब्रेझा कार चालक विक्रम सुरेश क्षीरसागर रा. कडवंची ता. जालना हे जालना शहरातून सिंदखेडराजाकडे कडवंची गावी जात असतांना सिंदखेडराजा चौफुली जालना येथे वरील बसला मधोमध डाव्या साईटला धडक दिली. कार चालकासह त्याची पत्नी शितल विक्रम क्षीरसागर रा. कडवंची यांच्या डाव्या पायाला जबर मार लागल्याने फॅक्चर झाला आहे व मुलगी साक्षी विक्रम क्षीरसागर दोन्ही रा. कडवंची ता.,जि. जालना यापैकी सीटबेल्ट लावल्यामुळे एयर बॅग उघडल्यामुळे किरकोळ मार लागला आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात भरती केले आहे. सदर बसला कारची जोराची धडक बसल्याने डाव्या साईटला रोडवर पलटी झाल्याने बस चालक भीमा तुळशीराम खिल्लारे रा. हिंगोली, बस डेपो हिंगोली वाहक बी.एस डांगे रा. हिंगोली, सदर बस मध्ये एकूण 13 प्रवासी होते व चालक व वाहक मिळून 15 जण होते.

वंदना अश्रुबा आरण रा. हिवरखेडा हिंगोली, गणपत देवराव जगताप रा. आळंदी,बस चालक भीमा तुळशीराम खिल्लारे, वाहक बळीराम शंकरराव डांगे या चौघांना गंभीर दुखापत झाली आहे. बाबासाहेब बापूराव गोडगे रा मंठा ता. मंठा जि.जालना, विश्वनाथ दत्ता बांगर, गणपत देवराव जगताप दोन्ही रा.आळंदी, मधुसूदन गणपत जाधव, मीरा विश्वनाथ बांगर हिंगोली, सरस्वती दामोदर जाधव रा. हिंगोली, बाबासाहेब तुकाराम खिल्लारे हिंगोली, कचरू ज्ञानोबा पाटोळे रा. हिंगोली, शिवाजी उत्तम कऱ्हाळे, रतनबाई नारायण नागरे रा. औंढा नागनाथ जि. हिंगोली, चित्रलेखा उत्तम कऱ्हाळे हे किरकोळ जखमी आहे

बसमधील सर्व प्रवाशांना तात्काळ सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवण्यात आले आहे. त्यानंतर क्रेनच्या साह्याने अपघात ग्रस्त कार ही रोडच्या बाजूला घेऊन व बसही बस डेपो जालना येथे पाठवण्यात आली. प्रभारी अधिकारी आर. के. निकम पोलीस उपनिरीक्षक सोबत पो. हे.का.मुंढे, बिऱ्हाडे, पोलीस कॉन्स्टेबल खराडे असे घटनास्थळी जाऊन पाहणी केली.