
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल यंदा कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे. 21 फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा सुरू झाली होती. ती मार्च महिन्यात संपली. लवकर परीक्षा घेण्यात आल्याने त्या लवकर संपल्या. त्यामुळे निकालही लवकर लागतील असे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल मेअखेरीस लागला होता. यंदा दहावीचा निकाल 15 मेपूर्वीच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.