राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने कुटुंबावर बेछूट गोळीबार केल्याची खळबळजनक घटना हिंगोलीत घडली आहे. या गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर चिमुकल्यासह एक जण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
विलास मुकाडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणावरून घडली हे अद्याप उघड झालेले नाही. फरार विलास मुकाडेच्या शोधासाठी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे. आरोपी सापडल्यानंतर नेमके कारण समोर येणार आहे.