श्रीलंकेच्या नौदलाने 11 हिंदुस्थानी मच्छिमारांना केली अटक, बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याचा आरोप

प्रातिनिधिक फोटो

श्रीलंकेच्या नौदलाने गुरुवारी उत्तर क्षेत्रात डेल्फ्ट बेटाजवळ 11 हिंदुस्थानी मच्छिमारांना त्यांच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याच्या आरोपाखाली अटक केली. तसेच त्यांची बोट जप्त केली. अटक केलेल्या मच्छिमारांना कनकासंथुराई बंदरात आणण्यात आले आहे, जिथे त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मलाडीच्या मत्स्यव्यवसाय निरीक्षकांकडे सोपवले जाईल.

दरम्यान, हिंदुस्थान आणि श्रीलंकेच्या मच्छिमारांमध्ये सागरी सीमेचे उल्लंघन हा एक संवेदनशील मुद्दा आहे. तामिळनाडूला श्रीलंकेपासून वेगळे करणारा पाल्क सामुद्रधुनी हा दोन्ही देशांतील मच्छिमारांसाठी एक समृद्ध मासेमारी क्षेत्र आहे. अनेकदा मच्छीमार अनवधानाने एकमेकांच्या सागरी हद्दीत प्रवेश करतात. ज्यामुळे अटक आणि बोटी जप्त केल्या जातात.