श्रीलंकेच्या महिला संघाने कारकिर्दीत प्रथमच महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावित इतिहास घडविला. सर्वाधिक सात वेळा आशिया चषक जिंकणाऱया व गतविजेत्या हिंदुस्थानचा पराभव करीत यजमान श्रीलंकेने झळाळत्या आशिया चषकावर आपले नाव कोरले. हर्शिथा समरविक्रमा या विजयाची मानकरी ठरली, तर कर्णधार चमिरा अटापट्टू ही ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ ठरली. श्रीलंकेने कारकिर्दीत पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले हे विशेष.!