
बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरची वसंत व्याख्यानमाला येत्या 28 ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित केली आहे. यंदा जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे कार्यकर्ते हेमंत पाटकर यांना, शारदा पुरस्कार ज्येष्ठ सुसंवादिनी मंगला खाडिलकर यांना तसेच प्रेरणा पुरस्कार बोरिवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा रुचिरा दिघे यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
दिवंगत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून वसंत व्याख्यानमाला सुरू झाली. त्यांच्या पश्चातही व्याख्यानमाला सुरू ठेवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. एकता विनायक चौक, टाटा पॉवर हाऊससमोर, जय महाराष्ट्र नगर, बोरिवली पूर्व येथे रोज सायंकाळी 7.30 वाजता दिग्गजांची व्याख्याने होतील, अशी महिती सचिन वगळ आणि प्रा. सौ नयना रेगे यांनी दिली.