हिंदुस्थानी महिलांनी पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 9 फलंदाज आणि 12.1 षटके राखून धुव्वा उडवित रविवारी 19 वर्षांखालील महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेत दणदणीत विजय मिळविला. सोनम यादवने पाकिस्तानी फलंदाजांची घेतलेली फिरकी आणि सामन्याची मानकरी ठरलेल्या जी. कामिलीनीची तुफानी फटकेबाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला 7 बाद 67 धावांवर रोखल्यानंतर हिंदुस्थानी महिलांनी केवळ 47 चेंडूंत फक्त एका फलंदाजाच्या मोबदल्यात 68 धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. लक्ष्याचा पाठलाग करताना तृषा गोंगडी भोपळाही न पह्डता बाद झाली. फातिमा खानने दुसऱ्याच चेंडूवर स्वतःच्या गोलंदाजीवर तिला झेलबाद करून पाकिस्तानला सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र त्यानंतर जी. कामिलीनी (नाबाद 44) व सानिका चल्के (नाबाद 19) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची अभेद्य भागीदारी करीत विजयाला गवसणी घातली. कामिलीनीने 29 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार ठोकले,