IPL Auction 2025 – श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू; पंजाबने मोजले 26.75 कोटी

IPL Auction 2025 मध्ये श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासाठी पंजाब किंग्सने तगडी बोल लावत त्याला संघात घेतले आहे. श्रेयस अय्यरने कोलकाता नाईट रायडर्सला त्याच्या नेतृत्वाखाली IPL 2024 चे विजेतेपद मिळवून दिले होतो. आता तो IPL इतिहासातील लिलावात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. पंजाबने श्रेयसला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले.

श्रेयसची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. श्रेयस अय्यरला मिळविण्यासाठी दिल्ली आणि कोलकाता यांच्यात लढत झाली. या दोघांमध्ये पंजाब किंग्जनेही बोलीत उडी घेतली. श्रेयस लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना अखेर विकत घेतले होते.

श्रेयस अय्यरने 2015 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून, अय्यरने आयपीएलमध्ये 116 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 127 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 3127 धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अय्यरची सर्वोच्च धावसंख्या 96 धावा आहे. या मोठ्या स्पर्धेत त्याच्या बॅटने 21 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली अय्यरने गेल्या वर्षी कोलकाताला 10 वर्षांनंतर आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. श्रेयस अय्यरने टी-20 मध्ये आतापर्यंत 5759 धावा केल्या आहेत. यामध्ये 36 अर्धशतकं आणि 3 शतकांचा समावेश आहे.