बुमराहऐवजी पंतकडे टीम इंडियाचे नेतृत्त्व द्या; माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला

न्यूझीलंड संघाने व्हाईटवॉश दिल्यानंतर आता टीम इंडियाबाबत सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहेत. न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश मिळाल्यानंतर आता टीम इंडियापुढ ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे आव्हान आहे. हिंदुस्थानी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

या मालिकेपूर्वी टीम इंडियाची धुरा कोण सांभाळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. आता रोहित पहिल्या कसोटीत नसल्याने बुमराहच संघाची धुरा सांभाळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने संघाचे नेतृत्व रिषभ पंतकडे सोपवावे, असे मत व्यक्त केले आहे.

सध्या टीम इंडियात रिषभ पंत हाच कसोटी कर्णधारपदाचा दावेदार आहे. रिषभ पंतच या पदाला योग्य न्याय देऊ शकतो. पंत जेव्हा खेळतो तेव्हा तो टीम इंडियाला फ्रंट फूटवर नेतो. मॅच विनिंग इनिंग अशी त्याची खेळी असेत. कोणत्याही परिस्थितीत धावा करण्याची क्षमता आहे. पंतने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत धावा केल्या आहेत. त्यामुळे बुमराह ऐवजी पंतकडे संघाचे नेतृत्व द्यायला हवे, असे कैफचे मत आहे. पण काही माजी क्रिकेटपटूंनी बुमराहवर विश्वास दाखवत त्याच्याकडे नेतृत्त्व सोपवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेृत्तव कोण करणार याची क्रिकेटरसिकांना उत्कंठा आहे.