
ध्रुव ब्रीदने 25 धावांत मिळवलेले पाच विकेट आणि हर्ष गायकरच्या नाबाद 69 धावांच्या खेळीमुळे स्पोर्टिंग क्लब कमिटीने युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएट्चा 9 विकेट्सनी दणदणीत पराभव करत फणसे स्मृती क्रिकेट स्पर्धेत विजय नोंदवला. युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएट्सला 83 धावांत गुंडाळल्यावर स्पोर्टिंगने अवघ्या 5.4 षटकांत 84 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
ध्रुवच्या भेदक माऱ्यासमोर युनायटेडच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. वृषभ रावलने 17, मानव पोकरने 12 आणि ओम पवारच्या 10 धावांमुळे युनायटेड संघाला 83 धावांपर्यंत मजल मारता आली. ध्रुवच्या जोडीने रायन भदुरीयाने दोन बळी मिळवले. प्रत्युत्तरादाखल हर्षने एकहाती फलंदाजीची बाजू सांभाळत नाबाद अर्धशतक झळकवत संघाला साखळी लढतीतील पहिला विजय मिळवून दिला. राज जैनने नाबाद 9 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएट्स ः 27.2 षटकांत सर्वबाद 83 (वृषभ रावल 17, मानव पोकळ 12, ओम पवार 10, ध्रुव ब्रीद 25/5 , राजन भदुरीया 12/2) पराभूत विरुद्ध
स्पोर्टिंग क्लब कमिटी ः 5.4 षटकांत 1 बाद 84 (हर्ष गायकर नाबाद 69, राज जैन नाबाद 9 दर्श पिल्ले 41/1).