क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील परलडका परिसरात शनिवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुल्लिया पुट्टूरच्या दिशेने चाललेल्या कारच्या चालकाला डुलकी लागली. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अपघाताची नोंद केली आहे.