संघ मुख्यालय भेटीत काय ठरलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये रिटायर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सप्टेंबर महिन्यात वयाची 75 वर्षे पूर्ण करतील. त्यानंतर ते पंतप्रधान पदावरून निवृत्त होणार आहेत. आपल्या निवृत्तीचा अर्ज देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयास भेट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले होते की, ज्यांचे वय 75 झाले आहे त्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींना या त्यांच्या आणि संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी संघ मुख्यालयात बोलावून घेतले. मोदी यांना सप्टेंबर महिन्यात वयाची 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. याबाबत मोदी यांच्याशी सरसंघचालक व अन्य प्रमुख नेत्यांनी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून

नरेंद्र मोदी यांचे वारस कोण असतील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवणार आहे. म्हणूनच मोदींना काल बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघाची चर्चा ही बंद दाराआड असते. ही चर्चा बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत. संघ पुढला नेता ठरवणार आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची एक भूमिका आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसतेय. ज्या अर्थी 10-11 वर्षांत मोदींना नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काय साधी गोष्ट नाही, असे संजय राऊत म्हणाले.

वडील जिवंत असताना मुलाचा विचार होत नाही

मोदीजी आमचे नेते आहेत. ते अजून बरीच वर्षे काम करणार आहेत. आमच्यासह संपूर्ण देश त्यांच्याकडे 2029चे पंतप्रधान म्हणून पाहतो. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्पृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. तो विचार करायचाही नसतो. त्यामुळे आता पुणाचाही व पुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही किंवा तसा प्रश्नही उपस्थित होत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर म्हणाले