विधिमंडळाचे आजपासून विशेष अधिवेशन

vidhanbhavan

287 आमदार घेणार शपथ कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष नव्या सरकारचा शपथविधीही झाल्यानंतर आता शनिवारपासून राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. निवडून आलेल्या 287 सदस्यांना या अधिवेशनात शपथ दिली जाईल. दरम्यान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली असून त्यांना आज राज्यपालांनी शपथ दिली. कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देणार आहेत.