अकरा दिवसांच्या गोंधळानंतर महायुतीच्या नेत्यांनी आज सरकार स्थापनेचा दावा केला. 5 डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यातच आमदारांच्या शपथविधीची तारीखही समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन 7 डिसेंबरपासून मुंबईत होणार असून, त्यात नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील आणि विधानसभा अध्यक्षांची निवड करतील. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे.
सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, नवनिर्वाचित आमदार 7 आणि 8 डिसेंबर रोजी शपथ घेतील आणि यानंतर 15 व्या विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक 9 डिसेंबर रोजी होणार आहे.