रशियातील महिलांना हटके ऑफर; चार मुले जन्माला घाला अन् 32 लाख मिळवा

जपानपासून चीनपर्यंतच्या देशात वृद्ध लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे जगातील अनेक देशांत तरुणाईंची संख्या कमी होत आहे. देशाला तरुणांचा देश करण्यासाठी अनेक देश नवनव्या ऑफर देत आहेत. जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी अनेक सुविधा दिल्या जात आहेत. पैसेही वाटले जात आहेत. रशियातील एका प्रांतात महिलांना अशीच एक ऑफर दिली जात आहे.

रशियातील निजनी नोवगोरोड ओब्लास्ट प्रांताचे गव्हर्नर ग्लेब निकितिन यांनी एक ऑफर जारी केली असून चार मुले जन्माला घातल्यास महिलांना 32 लाख रुपये देणार असल्याचे म्हटले आहे. रशियात जन्मदर खूपच कमी झाला आहे. या ठिकाणचा जन्मदर प्रति महिला 1.5 मुले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा जन्मदर खूपच कमी आहे. प्रति महिला जन्मदर कमीत कमी 2.1 मुले असायला हवा, असे रशिया सरकारचे म्हणणे आहे. याआधी रशियाचे आरोग्यमंत्री येवगेनी शेस्टोपालोव यांनीही जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे, असा सल्ला महिलांना दिला आहे.

काय आहे ऑफर

ही ऑफर फक्त 18 ते 23 या वयोगटातील महिलांसाठी आहे. पहिल्या-दुसऱया मुलांच्या जन्मानंतर पैसे पेंद्र सरकार तर तिसऱया आणि चौथ्या मुलांसाठीचे पैसे राज्य सरकार देईल.