वसई येथे 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेकडून पहाटे चर्चगेट-विरारदरम्यान दोन अतिरिक्त विशेष धीम्या लोकल धावणार आहेत. चर्चगेटहून 8 डिसेंबरला मध्यरात्री 2.30 वाजता धीमी लोकल चालवण्यात येईल. ही लोकल विरारला पहाटे 4.05 वाजता पोहोचेल. यानंतर मध्यरात्री 3 वाजता दुसरी विशेष लोकल चालवण्यात येईल. ही लोकल पहाटे 4.35 वाजता विरारला पोहोचेल. या दोन लोकलमुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रवास करणे सोयीचे होईल, अशी माहिती पश्चिम रेल्के प्रशासनाने दिली.