
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटतील आरोपी असलेल्या टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या 14 मालमत्ता केंद्र सरकारकडे सोपवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. 1994 पासून या मालमत्ता हायकोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात होत्या. वांद्रे, माहीम, सांताक्रूझ, कुर्ला, मोहम्मद अली रोडवरील एक कार्यालय, डोंगरी, मनीष मार्केट व शेख मेमन स्ट्रीट येथील मालमत्तांचा समावेश आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईच्या विविध भागात 13 साखळी बॉम्बस्फोट झाले, यात 257 जणांचा मृत्यू तर 700 हून अधिक जण जखमी झाले.