>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
नवरात्र उत्सव हा प्रामुख्याने नवरात्र व्रत या नावाने ओळखला जातो. हा उत्सव म्हणजे शक्ती देवतेचा उत्सव. शक्ती देवतेच्या संकीर्तनाचा उत्सव, सुर्जनाचा उत्सव, दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचे प्रतिपालन करणाऱ्या देवतांच्या उपकार स्मरणाचा उत्सव. नवरात्रोत्सव दुर्गापूजोत्सव म्हणूनही ओळखला जातो. बंगाल, बिहार, ओडिसा, आसाम, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या प्रदेशांत दुर्गापूजेचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. बंगालमध्ये त्याचा प्रचार आणि लोकप्रियता विशेष असून तो वर्षातला प्रमुख सणच मानला जातो.
नवरात्रोत्सव हा शक्ती देवतेच्या संकीर्तनाचा उत्सव, सुर्जनाचा उत्सव, दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचे प्रतिपालन करणाऱ्या देवतांच्या उपकार स्मरणाचा उत्सव. गुजरातमध्ये गरबा नृत्य खेळून नवरात्र साजरा केला जातो, तर महाराष्ट्रात नवरात्र उत्सवात देवीचे संकीर्तन होते ते गोंधळाच्या रूपाने. नृत्य ग्रंथावली ग्रंथात गोंधळाचा उल्लेख गोंडली नृत्य म्हणून केलेला आहे. नवरात्रोत्सव दुर्गापूजोत्सव म्हणूनही ओळखला जातो. बंगाल, बिहार, ओडिसा, आसाम, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या प्रदेशांत दुर्गापूजेचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो.
नवरात्र उत्सव हा प्रामुख्याने नवरात्र व्रत या नावाने ओळखला जातो. हा उत्सव म्हणजे शक्ती देवतेचा उत्सव. शक्ती देवतेच्या संकीर्तनाचा उत्सव, सुर्जनाचा उत्सव, दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचे प्रतिपालन करणाऱ्या देवतांच्या उपकार स्मरणाचा उत्सव. नवरात्रोत्सव दुर्गापूजोत्सव म्हणूनही ओळखला जातो. दुर्गापूजोत्सव हा उत्सव भाद्रपद कृष्ण नवमीपासून आश्विन शुद्ध नवमीपर्यंत करतात. आश्विन मासाच्या शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस करतात, सप्तमीपासून तीन दिवस करतात, अष्टमीपासून दोन दिवस करतात किंवा नवमीला एक दिवस तरी करतात, असे याचे विकल्प कालिका पुराणात सांगितले आहे. बंगाल, बिहार, ओडिसा, आसाम, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या प्रदेशांत दुर्गापूजेचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. त्यातल्या त्यात बंगालमध्ये त्याचा प्रचार आणि लोकप्रियता विशेष आहे.
बंगाली लोकांचा तो वर्षातला प्रमुख सणच आहे. प्रत्यक्ष उत्सव आश्विनात असला तरी भाद्रपदापासूनच या उत्सवाचा मोसम सुरू होतो. सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. बंगालमध्ये नवरात्र उत्सव म्हणजे कालिका मातेचा उत्सव. उत्सवासाठी दुर्गेची मातीची दशभुजा मूर्ती बनवतात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात. बंगालभर सर्वत्र वैयक्तिक व सार्वजनिक अशा उभयविध स्वरूपात दुर्गेच्या मूर्ती बसविल्या जातात. सार्वजनिक मूर्ती आकाराने मोठय़ा असतात आणि त्यावर खूप कलाकुसर केलेली असते. दुर्गापूजेच्या उत्सवाची सुरुवात आश्विन शु. पंचमीला होते. त्या दिवशी संध्याकाळी बोधन नामक एक विधी करतात. त्या वेळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे आवाहन करतात. राम-रावण युद्धाच्या प्रसंगी रावणाचा वध व्हावा म्हणून ब्रह्मदेवाने बेलाच्या वृक्षावरच तिचे आवाहन केले होते, अशी कथा आहे. षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक दुसरा विधी करतात. यात देवीच्या निरनिराळय़ा अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करतात व त्यांना पावित्र्य आणतात.
सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते. प्रथम बेल, डाळिंब, अशोक, हरिद्रा, इ. नऊ प्रकारच्या पल्लवांची एक जुडी करतात व ती अपराजितावल्लीने बांधतात. मग त्या जुडीला स्नान घालून साडी नेसवतात. तिला कलाबहू असे म्हणतात. ती गणपतीची पत्नी असते. उत्सवमूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात. त्यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे महास्नानाचा होय. त्या वेळी एका कलशावर आरसा ठेवतात आणि त्यात देवीचे जे प्रतिबिंब पडते, त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पितात. देवीच्या स्नानासाठी थंड व उष्ण जल, शंखोदक, गंगाजल, समुद्रजल, इ. जले, पंचगव्य, पंचामृत आणि गोठा, चौक, वारूळ, नदीचे पात्र, इ. ठिकाणची माती आणतात. त्यानंतर देवीची तिच्या परिवारासह पूजा करतात. मग तिला पशुबळी देतात. पूर्वी हे बलिदान फार मोठय़ा प्रमाणावर होत असे, पण सांप्रत त्याचे प्रमाण घटले आहे. अशीच पूजा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात. याशिवाय संधिपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात. ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते. त्या रात्री गायनवादन, खेळ यांच्या योगाने जागरण करतात. चौथ्या दिवशी संध्याकाळी देवीची मिरवणूक काढून तिचे नदीत किंवा तळय़ात विसर्जन करतात. दुर्गा ही या दिवसांत सासरहून माहेरी आलेली असते, अशी समजूत आहे. म्हणूनच बंगालमधल्या गृहिणी या माहेरवाशिणीसाठी नाना प्रकारची पक्वान्ने करतात.
अंदाजे एक हजार वर्षे तरी बंगालमध्ये हा उत्सव चालू आहे. बंगालमधूनच तो आसामात गेला व तिथून अन्यत्रही पसरला. या उत्सवासाठी प. बंगाल सरकारच्या कचेऱ्या आठ-दहा दिवस बंद करतात. या दिवसांत बाजारामध्ये लाखो रुपयांच्या उलाढाली होतात. नवे कपडे, दागिने इ. वस्तूंची खरेदी प्रामुख्याने याच दिवसांत होते. या पूजोत्सवात बंगाली स्त्री-पुरुष नटूनथटून इष्ट-मित्रांच्या भेटीला जातात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सांप्रत त्याला सामाजिक स्वरूप आले आहे. गुजरातमध्ये गरबा नृत्य खेळून नवरात्र साजरा केला जातो, तर महाराष्ट्रात नवरात्र उत्सवात देवीचे संकीर्तन होते ते गोंधळाच्या रूपाने. नृत्य ग्रंथावली ग्रंथात गोंधळाचा उल्लेख गोंडली नृत्य म्हणून केलेला आहे. हे गोंडली नृत्य भूतमातेच्या महोत्सवप्रसंगी सादर होते. गोंधळाचे दोन प्रकार आहेत. रेणूराई गोंधळ आणि कदमराई गोंधळ. कदमराई गोंधळ आख्यानाचे गोंधळ किंवा हरदासी गोंधळ म्हणून ओळखला जातो. रात्रभर रामायण, महाभारत, पुराणे, देवी महात्म्य यांच्यातील कथा गोंधळात नाटय़ रूपाने सादर होतात.
परभणीचे गोंधळी राजारामभाऊ कदम यांनी पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर भारत महोत्सवात गोंधळ सादर केला होता. नवरात्रात रेणूराई गोंधळी आरतीचा गोंधळ दरदिवशी सादर करतात. चव्हाण, कदम, शिंदे अशी कदमराई गोंधळी घराण्याची आडनावे असून रेणूराई गोंधळी पांचंगे, रेणके यांसारख्या नावाने ओळखले जातात. गणेशाचे वंदन, गवळण, देवीचे अवतार महात्म्य, देवीचे स्पुटपदे हा पूर्वरंग, तसेच एखाद्या पुराणातील कथेचे नाटय़ रूप हा उत्तररंग असे गोंधळाचे स्वरूप असते. संबळ, तुणतुणे, मंजिरी ही वाद्ये गोंधळात वाजवितात. नवरात्रात देवीचा जोगवा आणि फुलविऱ्याचीदेखील परंपरा असते. नवदुर्गांची कथाकवने गोंधळ आणि देवीच्या इतर संकीर्तन प्रकारात सादर होतात. या नवदुर्गा अशा, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंडा, स्कंदमाता, कूष्मांडी, दुर्गा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धिदायिनी. सकंदयामलात व अग्नी पुराणात पुढीलप्रमाणे आहेत – रूद्रचंडा, प्रचंडा, चंडोग्रा, चंडनायिका, चंडा, चंडवती, चंडरूपा, अतिचंडिका व उग्रचंडिका. भविष्य पुराणात त्यांची नावे महालक्ष्मी, नंदा, क्षेमकरी, शिवदूती, महारूद्रा, भम्ररी, चंडमंगला, रेवती व हरसिद्धी अशी आहेत. यांची आणखीही काही नावे आढळतात, ती अशी – नीलकंठी, रूद्रांश-दुर्गा, वन-दुर्गा, अग्नि-दुर्गा, जय-दुर्गा, विंध्यवासिनी-दुर्गा, रिपुमारी-दुर्गा इत्यादी. गोमंतकात मडकई येथे नवदुर्गेचे एक मंदिर असून त्यात तिची पाषाणमूर्ती महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. कोकणातील धनगर बांधव नवरात्रोत्सवाच्या समाप्तीला हमखास चपईनृत्य सादर करतात, तर सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ तालुक्यातील चित्रकथी नवरात्रोत्सवात मंदिरात देवीचे आख्यान लावतात व चित्राद्वारे या आख्यानाचे कथन होते. एकूणच नवरात्रोत्सव म्हणजे शक्ती देवतेचे जागरण होय.
(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत.)