विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय अध्यक्षांच्या कोर्टात

vidhansabha

विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. अध्यक्षांकडे बोट दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी विरोधी पक्षनेता निवड कधी होणार, असा प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे बोट दाखवले. विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्यांना आम्ही पूर्ण वाव दिला, त्यांचे ऐकून घेतले, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, असा दावा महायुतीच्या या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.

लक्षवेधी निकषात बसणाऱ्या

लक्षवेधी वाढल्या तरी हरकती नाही, पण निकषात बसणाऱ्या लक्षवेधी चर्चेला याव्यात, निकषाच्या बाहेरच्या येऊ नयेत अशी विनंती आम्ही अध्यक्षांना करणार आहोत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.