सिगारेटची ठिणगी पडून झाला स्फोट, व्हिडिओ पाहिल्यावर उडेल थरकाप

चीनमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. एका मजूराने सिगारेट प्यायल्यानंतर जळता तुकडा खिडकीतून बाहेर फेकला. ती फेकलेली सिगारेट फटाक्यांवर पडून मोठा स्फोट झाला. त्यानंतर आकाशात धुराचे लोट पसरले. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सिगारेट जिथे पडली तिथे फटाक्यांचा ढीग  होता. त्यावर जळती सिगारेट पडल्याने अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाबरोबर फटाक्यांना आग लागली आणि आकाशात आगीचे मोठे गोळे उडू लागले. हा स्फोट अचानक कसा झाला हे लोकांना काहीच न समजल्याने वेगवेगळे तर्क काढू लागले आणि इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. एका छोट्याशा ठिणगीमुळे फटाक्यांच्या दुकानात ठेवलेल्या सामानाला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्यात प्रचंड नुकसान झाले.

घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी परिसर रिकामा केला आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. अनेक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक त्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. धूम्रपान करणाऱ्यांनी त्यांची जबाबदारी समजून घ्यावी आणि अशा निष्काळजीपणापासून दूर राहावे. शिवाय कधीही जळती सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारची ठिणगी निष्काळजीपणे फेकू नका, अशा लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत.