एलन मस्कच्या Space X चे स्टारशीप फुटले; अवकाशात तुकडे तुकडे, विमानं ताबडतोब वळवली

Space X Starship

उद्योग जगतातील सगळ्यात मोठं नाव एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीला मोठा फटका बसला आहे. गुरुवारी टेक्सासहून प्रक्षेपण झाल्यानंतर अवकाशात काही मिनिटांतच स्पेसएक्स स्टारशीपचे प्रोटोटाइप बिघडले आणि फुटले. अवकाशातील कचरा विमानांवर पडू नये म्हणून अनेक विमानांचे मार्ग तात्काळ बदलावे लागले आणि एलोन मस्क यांच्या कंपनी मोठा फटका बसला. असे असले तरी स्टारशीपचे बुस्टर मात्र सुरक्षित परतले आहे.

दक्षिण टेक्सास रॉकेट सुविधांवरून संध्याकाळी 5:38 वाजता उड्डाणानंतर आठ मिनिटांनी मॉक सॅटेलाइट्सचा पेलोड घेऊन जात असताना स्पेसएक्स मिशन कंट्रोलचा स्टारशिपशी संपर्क तुटला.

रॉयटर्सने काढलेल्या व्हिडीओमध्ये हैतीयन राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्सवर आकाशात प्रकाशाचे नारंगी रंगाचे तुकडे पसरलेले दिसत होते आणि धुराचे लोट मागे पडत होते.

‘स्टारशीपचा संपर्क तुटला. खरं तर पहिल्या टप्प्यात सगळं बरोबर सुरू होतं. पण पुढल्या काही तर बिघाड झाला’, अशी माहिती स्पेसएक्स कम्युनिकेशन्स मॅनेजर डॅन हुओट यांनी दिली. काही मिनिटांनंतर जहाज हरवल्याची पुष्टी करण्यात आली.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही उड्डाणे वळवण्यात आली. FlightRadar24 वरील ट्रॅकिंग वेबसाइटच्या उड्डाण नोंदींवरून, स्टारशीपच्या कचऱ्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी किमान 20 उड्डाणे इतर विमानतळांवर वळवण्यात आली किंवा मार्ग बदलण्यात आला. खासगी प्रक्षेपणाचे नियमन करणाऱ्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितलं की ते घडलेल्या घडनेचा रिपोर्ट तयार करत आहेत.

स्पेसएक्सचे सीईओ मस्क यांनी X वर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये स्टारशीपचा कचरा पडताना दिसत आहे. सोबत मस्क यांनी कॅप्शन दिली आहे की; ‘यश अनिश्चित आहे, मात्र मनोरंजनाची हमी आहे!’