सुस्वागतम्…! 9 महिने 14 दिवसांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर

हिंदुस्थानी वंशांच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी धैर्य आणि शौर्याने अनोखा अध्याय रचला. 9 महिने 14 दिवस अंतराळात राहून सुनीता पृथ्वीवर परतल्या. केवळ आठ दिवसांसाठी गेलेल्या सुनीता अंतराळात अडकल्या. त्या परततील की नाही, अशी भीती होती. पण विज्ञानाचा चमत्कार घडला. स्पेसएक्सचे ड्रॅगन यान सुनीता आणि बुच विल्मोर यांना घेऊन हिंदुस्थानी वेळेनुसार बुधवारी पहाटे 3.27 वाजता फ्लोरिडाच्या समुद्रात उतरले.