स्पेस एक्सने शनिवारी फ्लोरिडामधून कॅप कॅनारवेलमधून उड्डाण घेतले आहे. यामध्ये दोन प्रवासी होते आणि दोन जागा रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी या जागा ठेवण्यात आल्या आहेत. दोघेही गेले अनेक महिने आंतरराष्ट्रीय अंतराळातील एका स्टेशनवर अडकले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मोर दोघेही आपल्या मूळ अंतराळातील यान स्टारलाईनरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ६ जून पासून अडकले आहेत.
क्रून ९ मिशन नासाचे आंतराळ प्रवासी निक हेग आणि अॅलेक्झांडर गोरबुनेव यांना आंतरराष्ट्रीय आंतराळ स्टेशनवर घेऊन जाईल. या मिशनची विशेष बाब म्हणजे या उड्डाणात चार ऐवजी दोनच सदस्य असतील. कारण उर्वरित जागा या विल्यम्स आणि विल्मोर यांच्यासाठी ठेवण्यात आली आहे. ज्या आंतराळ यानात विलियम्स आणि विल्मोर अडकले आहेत त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यात डॉकिंग प्रक्रियेलेळी हिलीयम लीक आणि थ्रस्टर फेल्युएर झाले होते.